आदर्शग्रामच्या बेवड्याईचे ‘अच्छे दिन’!
‘मेड इन इंडिया’, ‘आमदार निवास रूम नं. १७५६’ आणि ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ यांसारख्या अतिशय वेगळ्या धाटणीच्या कादंबऱ्या लिहून मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर (वय ६३) यांचे १७ जुलै २०१९ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ‘होबासक्या’ हे विनोदाच्या माध्यमातून सामाजिक वास्तवांवर भाष्य करणारं त्यांचं सदर लोकप्रिय होतं.......